Tuesday, May 26, 2015

काय असते ही कविता ?

असते निव्वळ शब्दांची ठेवण ,
की एखाद्याचे दीर्घ जीवन … 

असते केवळ शब्दांचे बिछाने ,
की एखाद्याचे बिनधास्त तऱ्हाने …

असते  कुणीतरी केलेले वर्णन ,
की जणू आपणच केली आहे- 
अशी वाटणारी शब्दांची घडण … 

असते एखाद्याची निर्मळ विचारणा ,
की जणू आपल्यालाच सुचणाऱ्या कल्पना… 

कवितांतून होते भावनांची जडणघडण,
मोहक अर्थाने भारावून जातात काहीजण … 

कविता आहेच अशी संकल्पना ,
संपूर्ण जगाला जी देते अफाट प्रेरणा … 

-वेदांती

काय असते ही कविता ?
काय असते ही कविता ?