Saturday, January 7, 2017

।। विवाहा निमित्य मंगलाष्टके।।


सोनेरी दिन मुहूर्त सजला , पाठी उभा गणपती
श्री स्वामी समर्थ सत्वर येती , वधूवरास ते रक्षती।
करवीरवासी अंबा माता , सज्जही रथ जोडुनी ।    
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम्।।१।।

आली लग्न घटी समीप नवरा घेऊनी यावा घरा ।
गृहयोक्ते मधुपर्क पूजन करा अंतःपटाते धरा।
दृष्टादृष्ट वधूवरा न करतां दोघे करावी उभी ।
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम् ।।२।।

' वधूमातेचे  नाव ' च्या हृदयी अमाप असती , प्रेमातले शिंपले ।
देवाने दिधले वधूपित्याचे नाव  ' सौभाग्य हे आगळे ।
मांगल्ये  समई इथे उतरला , मोदात गोतावळा । 
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम् ।।३।।    
    
आहे ज्ञात जना समस्त इतुके , संसार ही  साधना ।
हाती वधूचे  नाव '  गोड गंधित फुले , हो नित्य आराधना ।
प्रेमाची  पसरो प्रभा परिमले , प्रेमातल्या प्रांगणी ।
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम् ।।४।।

मलयगिरीचे चंदन अत्तर , ' वराचे नाव   ' देई फाया ।
वधूचे नाव' स्नुषा ' सासरचे आडनाव '  गृही , सुख शांतीची छाया ।
दो वधुवर ते प्रेमे भरती , सुखामृताचा घडा ।
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम्।।५।।