Showing posts with label friendship. Show all posts
Showing posts with label friendship. Show all posts

Wednesday, January 27, 2016

तुझं तेच माझं

सुख दुःखाच्या क्षणांत
साथ मैत्रीला देत चला,
चिमुकल्या यशालाही
आनंदाने मिरवित चला....

आहे कुणी सोबत म्हणून
धीर जरासा मिळेल....
आत्मविश्वास वाढविणारा
आधार मैत्रीचा मिळेल....

तुझं माझं असं काही नाही
हाच मैत्रीचा नारा,
असावा मित्रपरिवार अपुला
सर्वांस समजून घेणारा....

टिकून राहो नेहमी
अशीच गोड ही मैत्री,
एकमेकांस सांभाळणारी
अशी ही खात्री.... 

-वेदांती

tuz tech maz