Showing posts with label move on. Show all posts
Showing posts with label move on. Show all posts

Thursday, February 11, 2016

आहोत समर्थ आपण

गेलो हारविल्या आधी कधीतरी;
म्हणून
नेहमीसाठीच हरलेलो नाही आपण...

गेलो बनविल्या मूर्ख मध्यांतरी;
म्हणून
नेहमीसाठीच मूर्ख नाही आपण...


झालो निराश आधी केंव्हातरी;
म्हणून
नेहमीसाठीच निराश नाही आपण...

आली वादळे छोटी मोठी कितीही जरी,
तरी
रहायचं नसतं त्यांत अडकून आपण...

येतील काटे मार्गात कितीही जरी,
तरीसुद्धा
सतत पुढेच जात रहायचं असतं आपण...


मार्ग काढू कुठल्याही अडचणींतून,
कारण 
आहोत त्यासाठी समर्थ आपण… 
-वेदांती