Showing posts with label girl. Show all posts
Showing posts with label girl. Show all posts

Saturday, March 12, 2016

परकं धन

म्हणे ती आहे परकं धन,
मग सोडताना हात तिचे,
का दाटुनि जातं हे मन?

कठिण गं पोरी ही वाट,
पण येईल पुन्हा,
नवी पहाट...

आपुलकीने अपुल्या,
कर सर्वांचा तू सांभाळ…


संकटावर होऊनि खंबीर ,
सावर तू अपुला संसार,

सहवासाने तुझ्या गं पोरी, 
सदाच उजळू दे, ते घरदार …
-वेदांती