Showing posts with label motherhood. Show all posts
Showing posts with label motherhood. Show all posts

Wednesday, January 28, 2026

आई




आज वाटलं आईबद्दल,
काहीतरी लिहावं, काहीतरी बोलावं….

पण तिच्यासाठी लिहिताना,
शब्द शिल्लक राहणार नाही,
कौतुक तिचं संपणार नाही….

एवढंच म्हणेन की,
ती म्हणजे अन्नाला चव आणणारे मीठ,
ती म्हणजे आयुष्याला लय आणणारे गीत….

ती म्हणजे साखरेतली गोडी,
ती म्हणजे कधी न बुडणारी होडी….

तिनेच शिकवले आयुष्यातले कित्येक धडे,
तिच्या प्रार्थनांमुळेच तर आलोय इतकं पुढे….

वेदांती