Friday, August 8, 2014

ध्येयपूर्तीचं स्वप्न

आयुष्य कसं हवेच्या झुळूकेसारखं भरकन निघून
जाणारं असतं .....
आणि त्यातून अनेक शैली कौशल्ये शिकवून
जाणारं  असतं....

आयुष्यात कोण कधी कुठे पोहोचणार हे सांगणं
किती कठीण आहे ना...
पण त्यातील या 'कोणाची' कशी स्थिती असावी
हे मात्रं ठरलेलं आहे...

प्रबळ इछाशाक्तिनेच , मन आकाशातील
पक्श्याप्रमाणे उंच भरारी घेऊ शकतं...
ध्येय ठेवूनच , आपल्या मार्गावर चालू शकतं...

ध्येयाकडे लक्ष केन्द्रित करून, आयुष्य तेजोमय
बनवायचं असतं...
सत्य आणि सभ्यतेच्या मार्गानेच, मनाचं
ध्येयपूर्तीचं स्वप्न शक्य असतं...

आयुष्यातील संधीना ओळखून पुढे निघत
जायच असतं...
एवढंच की, समाधानी होऊन; या  विश्वाच्या
आभारी व्हायचं असतं.....

-वेदांती
Dheyapurtich Svapn


English Translation:A dream of goal fulfillment

Life moves swiftly, like a breeze…
And in its flow, it teaches us countless styles and skills.

How difficult it is to predict who will reach where in life…
Yet, the state of that “someone” is always destined.

With strong willpower, the mind can soar like a bird in the sky…
Only by setting a goal can one walk their path.

By focusing on the goal, life must be made radiant…
Only through truth and grace can the mind’s dream of fulfillment come true.

One must recognize the opportunities in life and move forward…
And above all, be content—and grateful to this universe.

Vedanti