Saturday, September 13, 2014

व्हावी जाणिव

निघू आता या निरर्थकतेतून  ,
शोधू नवे मार्ग काही त्यातून...

नाही गरज आता भित्रेपणाची,
वेळ आहे जाणिवेची नि कर्तृत्वाची....

मग घेणार आहात ना ही जबाबदारी?

कळू देणार ना तुमचे अस्तित्व नि समजदारी?

आहे हृदयातून प्रार्थना हीच परमेश्वराला,
सदा कदा मन लागो सन्मार्गाला...

जरी आपल्यावरच आहे सर्वकाही अवलंबून,
परंतु घडते तेच ज्यास मंजूरी आहे परमेश्वराकडून....

-वेदांती
vhavi janiv

Thursday, September 11, 2014

देवा घरची फुले

मुले म्हणजे देवाघरची फुले
बेभान होऊन प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी...

प्रत्येकाच्या आयुष्यात सुगंध दरवळवणारी...
भोळी-भाबडी आणि मातापित्यांची नाजूक कळी असणारी...

पण काहींनी तर कळीला नीट उमलू सुद्धा दिले नाही...
त्या राक्षसांना त्या नाजुक कळ्यांवर इतकिशीही दया आली नाही...

कित्येक मातापित्यांची डोळे भिजली
नि भिजून कोरडीही पडली...

नको का न्याय मिळावा त्या कोमल कळ्यांना?
उमलण्याआधीच ज्यांचा जीव घेतला गेला...

असल्या मानवरूपी राक्षसांना आपणाला संपवायचे आहे...
पुन्हा नवे राक्षस तयार होणे थांबवायचे आहे...

कितीतरी कळ्या तर तुटून गेल्या उमलतानाच,
पण नव्या उमलणार् या कळ्यांना मात्र आपणाला
मोकळा श्वास घेऊ द्यायचा आहे....


-वेदांती
देवा घरची फुले
देवा घरची फुले