वेळ

वेळ न सांगताच हवेसारखी झुळकन् निघून जाते आणि ती गेल्यावर पश्चाताप करण्याव्यतिरिक्त आपल्याजवळ कुठलाच पर्याय नसतो. आपल्याला जर कुठलेही ध्येय साध्य करायचे असेल तर हिच्या संगतीत राहणे आवश्यक आहे. एकही क्षण न गमावता एकमतच करणे बरे. कारण गमावताना तर कधीच तिचे महत्व कळत नाही पण नंतर कार्य पुर्तीसाठी हीच वेळ उरत नाही . प्रत्येक कार्यासाठीच ती जरुरी नि अमूल्य आहे. वेळेशी जुळणे खूप महत्वाचे आहे. 
प्रगतीच्या मार्गावर चालताना वेळेचे भान ठेवूनच समोरचा पाऊल उचलायचा असतो.  प्रत्येकाकडे ती एकच गोष्ट सारखी असते . फक्त हेच कि वेळेचा कोण कसा उपयोग करून घेतो यावर सगळं अवलंबून असते . म्हणूनच वेळेचे नियोजन ही एक महत्वाची बाब असून ती जणू यशाची पहिली पायरीच आहे . प्रत्येकाने वेळेचे नियोजन करायलाच हवे आणि पुरेपूर उपयोग करायला हवा . 

वेदांती