इतर

1.पहचान
ये जीवन एक राह नही , दो राहा है
पहला रास्ता  बहूत सरल है
इस रास्ते पर कोई मोड नही है 
यह रास्ता  दुनिया से बेजोड नही है……

दूसरा रास्ता बहूत कठिन है 

इस रास्तेपर धूप है 
कोई छाव नहीं है 
कोई तसल्ली भीख में दे दे
इस रास्तेपर ऐसा कोई गाँव नहीं है……

तुम इस रास्तेपर ही चलना

मुझे पता है ये रास्ता आसान नहीं है 
लेकिन मुझको यह ग़म भी है की क्यों……

तुमको अब तक अपनी पहचान नहीं है…… 

(जावेद अख्तर )

2.वाणी 
गिरना भी अच्छा है ,
औकात का पता चलता है। 

बढ़ते हैं जब हाथ उठाने को ,
अपनों का पता चलता है !

जिन्हे गुस्सा आता है 
वो लोग सच्चे होते है,

मैंने झुठोंको अक्सर 
मुस्कुराते हुए देखा है !

सिख रहा हु अब मै भी 
इंसानोको पढ़ने का हुनर ,

सुना है चहरे पे किताबों से 
ज्यादा लिखा होता है!!!
(श्री अमिताभ बच्चन )


3.नाती
फुल  बनून हसत राहणे हेच जीवन आहे …. 
हसता हसता दुखं विसरून जाणे हेच जीवन आहे…. 

भेटून तर सर्वजण आनंदी होतात,

पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे….
(अपरिचित )


4.शब्द
शब्दांनीच शिकवलंय पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलंय रडता रडता  हसायला ,

शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि 
शब्दांमुळेच मिळते  एखाद्याची आयुष्यभर साथ ,

शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा आणि 
शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा,

शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि 
शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी…. 

म्हणूनच  जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि 
जो मन जिंकेल तो जग जिंकेल…. 
(अपरिचित)

5.देवाची कैफियत
तोच तोच नारळ,
तिच तिच केळी..?
दाखवाना कधीतरी,
मलाही स्ट्रॉबेरी..!

तेच तेच भजन,
तिच तिच आरती..?
ऐकवाना कधीतरी,
सिलाेन विविध भारती..!

सोडा रे मलाही,
थोडा वेळ मोकळा.
खाऊ द्या ना मलाही,
मस्त गुजराती ढोकळा..!

ऐवढ्या मोठ्या गाभार्‍यात,
कुबट तेलकट वास.
गुदमरतो रे माझाही,
सारखा इथं श्वास..!

चांदी सोन्यानं मढवलं,
तेंव्हाच होतो घाबरलो.
टाळं ठोकायच्या आतच,
धुम ठोकून पळालो..!

शोधतोस पत्ता माझा..?
मी तर अंगणात तुझ्या इथे..!
शोधतोस दगडात वेड्या,
नव्हतोच मी कधी तिथे..!!!
(अपरिचीत)

6.ओढ
कुणाची इतकीही ओढ नसावी की ,
पदोपदी आपण त्याचीच वाट पहावी,
त्याची वाट बघता बघता ,
आपलीच वाट दिशाहीन व्हावी ….

कुणाला इतकाही वेळ देऊ नये की ,
आपल्या क्षणाक्षणावर त्याचाच अधिकार व्हावा ,
एक दिवस आरशासमोर आपणास,
आपलाच चेहरा परका व्हावा …. 

कुणासाठी कधीही इतके रडू नये की ,
अश्रूंनी आपले अस्तित्व मिटवावे ,
मग रक्तरंजित नयनांनी ,
जिवंत असतांनाच मरण अनुभवावे…. 

कुणाचे इतकेही ऐकू नये की ,
कानात त्याचाच घुमजाव व्हावा …. 

कुणाला स्वप्नात इतकेही बघू नये की ,
आधाराला त्याचेच हात असावे,
तुटलेच जर अचानक स्वप्न ,
तर हातात आपल्या काहीच नसावे …. 

कुणाची इतकी सोबत असू नये की ,
प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी ,
तिची साथ गमविण्याच्या केवळ भितीने ,
इतर लेख 

डोळ्यात खडकन अश्रू जमावी ….
(अपरिचीत)