Monday, September 21, 2015

हे गणराया!

तूच कर्ता नि करविता हे गणराया,
तुजविन सांग कोण करील माया...

अलौकिकतेने धन्य तुझी मूर्ती,
पसरलेली विश्वात तुझीच कीर्ति...

कृपेने तुझ्या पृथ्वी सुद्धा भावली...
आम्हावर पडू दे तुझी कृपा सावली,

नको काही आम्हास शिवाय कृपादृष्टि,
असु दे छायेत तुझ्या ही सारी सृष्टी...

-वेदांती
गणपती बाप्पा मोरया!
He ganraya
हे गणराया

Thursday, September 10, 2015

तुझ्यासवे तुझ्याविना

क्षणोक्षणी आठवण यावी तुझी
प्रत्येक स्वप्नात भेट व्हावी तुझी

तू दिसताच एकाएकी मन हरवावे
सहवासात तुझ्या भान हरपून जावे

आतुर तुझी एक झलक बघण्यासाठी
प्रतिक्षेत मी तुझ्या एका नजरेसाठी

तुझ्याविना अप्रकाशित हे तारे
तुझ्यासवे मनोरम्य जीवन सारे

वाटे लाभो सहवास तुझा जन्मान्तरी 
व्हावा तुझा जीव माझ्याच अन्तरी

संगतीत तुझ्या फुलावी स्वप्न नवी  
गंध प्रेमाचा फुलवीत तुझीच साथ हवी
-वेदांती  

tuzyasave tuzyavina  

Friday, September 4, 2015

गर्व आहे शिक्षकांचा

प्रतिक आहेत ते सखोल ज्ञानाचे,
मार्गदर्शक ते यशस्वी जीवनाचे....

घडविणे विद्यार्थ्यांना हाच त्यांचा प्रयत्न सतत,
तयार असतात ज्यासाठी करण्यास वाटेल ती मदत....

पाया मजबूत होण्यासाठी त्यांचे दिव्य योगदान,
आहे जणू आपणास लाभलेले तेे वरदान....

जितकी सांगावी थोरवी तितकी थोडी,
चुकल्यास जे आपली खोड सुद्धा मोडी....

बालपण असो वा मोठपण,
शिक्षकांचे ऋणिच आपण सर्वजण....

आई-वडिलांपेक्षाही मोठा मान त्यांचा,
आम्हाला गर्व आहे जगातील सर्व शिक्षकांचा....


-वेदांती

गर्व आहे शिक्षकांचा
गर्व आहे शिक्षकांचा