Saturday, December 26, 2015

बघावित स्वप्न!

लहान मंडळी असो वा मोठी...
स्वतःसाठी असो वा इतरांसाठी...

स्वप्न तर बघतातच सगळे...
नाही कुणीच त्याविन वेगळे...

अधीर असून चालणार कसे?
उंच भरारी घेण्याचे ध्येयच असे…

बघावित  स्वप्नं , करण्यासाठी त्यांना पुरे...
होतीलच कधिनाकाधि ते स्वप्न खरे...

-वेदांती
baghavit svapn

सुंदर ते बालपण!

विसरेल कसे लहानपणीच्या पक्क्या मैत्रीला...
पावसांत भिजून आकाशात उडविणाऱ्या छत्रीला...

गड्यांसोबत खेळण्यात-मिरवण्यात जीव तो रमलेला...
बाबांना घाबरून आत येणाऱ्या आईच्या त्या कुशीला...

स्वतः रेखाटलेल्या त्या पर्वताआडच्या सूर्याला...
मस्तीत फिरवणाऱ्या आवडत्या भोवऱ्याला...

आठवतेय वारंवार घसरुन पडण्याची ती शृंखला...
तरी सुद्धा हसत उभं होण्याची निराळीच ती कला...

तसंच बिनधास्त होऊन जीवन जगायचंय मला...
अधूनमधून येणारे दुःख विसरून हसायचंय मला...

बेभान होऊन आकाशात उडायचंय मला...
सुंदर ते बालपण परत मिळवायचंय मला...

-वेदांती

सुंदर ते बालपण
सुंदर ते बालपण

Monday, December 7, 2015

असंही जगून बघायचं

खळखळून हसायचं आणि हसवायचं...
हसून जगायचं आणि क्षणात मिरवायचं...

नेहमी खुश व सकारात्मक रहायचं...
सगळ्यांनासुद्धा खूश ठेवायचं...

जे आवडतं ते सगळं करायचं...
आवडतं नाम स्मरत रहायचं...

राग आवरायला शिकायचं...
इतरांनाही समजून घ्यायचं...

असंही एकदा जगून बघायचं...
नवं काहीतरी करून बघायचं...

कोण जाणे आज आहोत वा उद्या;
आपण मात्र-
प्रत्येक क्षणात भरभरून जगायचं...
-वेदांती

Asahi Jagun Baghaycha