Wednesday, January 27, 2016

तुझं तेच माझं

सुख दुःखाच्या क्षणांत
साथ मैत्रीला देत चला,
चिमुकल्या यशालाही
आनंदाने मिरवित चला....

आहे कुणी सोबत म्हणून
धीर जरासा मिळेल....
आत्मविश्वास वाढविणारा
आधार मैत्रीचा मिळेल....

तुझं माझं असं काही नाही
हाच मैत्रीचा नारा,
असावा मित्रपरिवार अपुला
सर्वांस समजून घेणारा....

टिकून राहो नेहमी
अशीच गोड ही मैत्री,
एकमेकांस सांभाळणारी
अशी ही खात्री.... 

-वेदांती

tuz tech maz

Thursday, January 14, 2016

DBM चं स्पंदन!!!!

Blind Risk असो वा Selfie Fever
Sack race असो वा FB Fever
DBM चा पगडा भारी
स्पंदन नी घेतली उंच भरारी

Angry Birds ने केली कमाल
Rodies नेही दाखवली धमाल

T-shirt Painting चा तर जवाब नाही
Poster Competition ची तर बातच सही

Lagan आमचा सर्वात भारी
Ranbhumichi होती गोष्टच न्यारी

असाच आनंद देत-घेत सर्वांसाठी
Spandan दरवर्षी येत राहील DBM साठी

-वेदांती
Dedicated to our Spandan Team DBM


DBM चं स्पंदन!!!!
DBM चं स्पंदन!!!!


Friday, January 1, 2016

करूया नवी सुरुवात!

करूया सुरुवात हास्याने,
गाऊनी आयुष्याची  गाणी...

करूया स्वागत नव्या तऱ्हेने,
लिहूनी नवी कहाणी...

घेऊनी  एकेक क्षणाचा आस्वाद,
जावो वर्ष हसत-गात...

विसरूनी सारे दोष वाद,
मनवू  नववर्ष  आनंदात...

जीवनात सुख समृद्धी लाभो,
हीच अपुली आहे आस! 

-वेदांती
करूया नवी सुरुवात
करूया नवी सुरुवात

It's a New start and a new life. Start this year with a beautiful Smile and Welcome the year with new and different ways of life. Enjoy each n every moment. Leave your worries behind. Forget about the flaws. Celebrate new year with a joy. May this year bring happiness n prosperity in your life.