Tuesday, February 28, 2017

हवं ते मिळो तुला

गेले तुझ्यात विसरून,
सांगते मी तुला...

भान अपुले हरवून,
शोधते मी तुला...

स्वप्न माझे सजवून,
रंगते मी तुला...

हातामध्ये हात घेऊन,
शोभते मी तुला...

सांगता येईना शब्दातून,
स्मरते मी तुला...

गोड नातं प्रेमाने जोडून,
जपते मी तुला...

सुख सारेच तुझ्यातून,
हवं ते मिळो तुला...

वेदांती

Hava Te Milo Tula



Saturday, January 7, 2017

।। विवाहा निमित्य मंगलाष्टके।।


सोनेरी दिन मुहूर्त सजला , पाठी उभा गणपती
श्री स्वामी समर्थ सत्वर येती , वधूवरास ते रक्षती।
करवीरवासी अंबा माता , सज्जही रथ जोडुनी ।    
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम्।।१।।

आली लग्न घटी समीप नवरा घेऊनी यावा घरा ।
गृहयोक्ते मधुपर्क पूजन करा अंतःपटाते धरा।
दृष्टादृष्ट वधूवरा न करतां दोघे करावी उभी ।
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम् ।।२।।

' वधूमातेचे  नाव ' च्या हृदयी अमाप असती , प्रेमातले शिंपले ।
देवाने दिधले वधूपित्याचे नाव  ' सौभाग्य हे आगळे ।
मांगल्ये  समई इथे उतरला , मोदात गोतावळा । 
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम् ।।३।।    
    
आहे ज्ञात जना समस्त इतुके , संसार ही  साधना ।
हाती वधूचे  नाव '  गोड गंधित फुले , हो नित्य आराधना ।
प्रेमाची  पसरो प्रभा परिमले , प्रेमातल्या प्रांगणी ।
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम् ।।४।।

मलयगिरीचे चंदन अत्तर , ' वराचे नाव   ' देई फाया ।
वधूचे नाव' स्नुषा ' सासरचे आडनाव '  गृही , सुख शांतीची छाया ।
दो वधुवर ते प्रेमे भरती , सुखामृताचा घडा ।
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम्।।५।।