सोनेरी दिन मुहूर्त सजला , पाठी उभा गणपती ।
श्री स्वामी समर्थ सत्वर येती , वधूवरास ते रक्षती।
करवीरवासी अंबा माता , सज्जही रथ जोडुनी ।
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम्।।१।।
आली लग्न घटी समीप नवरा घेऊनी यावा घरा ।
गृहयोक्ते मधुपर्क पूजन करा अंतःपटाते धरा।
दृष्टादृष्ट वधूवरा न करतां दोघे करावी उभी ।
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम् ।।२।।
' वधूमातेचे नाव ' च्या हृदयी अमाप असती , प्रेमातले शिंपले ।
देवाने दिधले ' वधूपित्याचे नाव ' सौभाग्य हे आगळे ।
मांगल्ये समई इथे उतरला , मोदात गोतावळा ।
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम् ।।३।।
आहे ज्ञात जना समस्त इतुके , संसार ही साधना ।
हाती ' वधूचे नाव ' गोड गंधित फुले , हो नित्य आराधना ।
प्रेमाची पसरो प्रभा परिमले , प्रेमातल्या प्रांगणी ।
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम् ।।४।।
मलयगिरीचे चंदन अत्तर , ' वराचे नाव ' देई फाया ।
' वधूचे नाव' स्नुषा ' सासरचे आडनाव ' गृही , सुख शांतीची छाया ।
दो वधुवर ते प्रेमे भरती , सुखामृताचा घडा ।
नांदा सौख्य भरे तुम्ही तव गृहा , कुर्यात सदा मंगलम्।।५।।