तूच धरणी , तूच जननी
तूच भगिनी , तूच कारभारिणी
तूच दुर्गा , तूच भवानी
तूच जिजाई नि तूच झाशीची राणी
तूच जिजाई नि तूच झाशीची राणी
रणांगणात घेऊनी भाला , लढली जी प्राण ओतुनि
शिखरावरती पोहोचलेली , आहेस तू जगतोद्धारिणी

रुपे तुझी अनेक , प्रत्येक रुपात तू संपूर्ण
पाहिलेले प्रत्येक स्वप्न , करते तू परिपूर्ण

मन तुझे ओजस्वी , विसरत नाही जे कर्तव्य
हृदय तुझे मनस्वी , तुझ्यावर अवलंबून भवितव्य

स्पर्श तुझा राजस्वी , अश्मालाही आणतो दिव्यत्व
दृष्टी तुझी तेजस्वी , निर्जीवालाही आणते देवत्व
दृष्टी तुझी तेजस्वी , निर्जीवालाही आणते देवत्व
रुपे तुझी अनेक , प्रत्येक रुपात तू संपूर्ण
खर्या आयुष्याची नटीच तू , आहे जी परिपूर्ण