Saturday, August 1, 2015

संगतीचा परिणाम

सखोल ज्ञान ही विशेषता पुस्तकाची ,
पुस्तकाला हवी साथ ती ज्ञानाची…

निर्मळ संस्कार ही विशेषता संतांची ,
संतांना हवी साथ ती संस्कारांची…

त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ सर्वोज्ञानाची …
नि हृदयाला हवी आहे साथ संस्कारांची …

सर्वज्ञान आणि सुसंस्कारांच्या संगतीनेच ,
पूर्ण होऊ शकते यात्रा या सुंदरमय  जीवनाची।।१।।

तेजोमय प्रकाश ही विशेषता सुर्याची ,
सूर्याला हवी साथ  ती प्रकाशाची…

सुगंधित दरवळ ही विशेषता फुलाची ,
फुलाला हवी साथ ती  सुगंधाची …

त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ सुविचारांची… 
नि हृदयाला हवी आहे साथ प्रेमाची…

सर्वोच्च विचार आणि प्रेमाच्या संगतीनेच ,
पूर्ण होऊ शकते यात्रा या रहस्यमय जीवनाची।।२।।

उत्कृष्ट कला ही विशेषता कलाकाराची ,
कलाकाराला हवी ती साथ कलेची … 

शांत चित्त विशेषता आनंदी हृदयाची ,
हृदयाला हवी ती साथ शांत चित्ताची …

त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ कलेची  …
नि हृदयाला हवी आहे साथ शांत मनाची  …

स्मित हास्य आणि शांत मन यांच्या संगतीनेच ,
सुरु ठेवावी यात्रा या आनंदमय  जीवनाची।।३।।

वेदांती

sangticha parinam
संगतीचा परिणाम