सखोल ज्ञान ही विशेषता पुस्तकाची ,
पुस्तकाला हवी साथ ती ज्ञानाची…
निर्मळ संस्कार ही विशेषता संतांची ,
संतांना हवी साथ ती संस्कारांची…
त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ सर्वोज्ञानाची …
नि हृदयाला हवी आहे साथ संस्कारांची …
सर्वज्ञान आणि सुसंस्कारांच्या संगतीनेच ,
पूर्ण होऊ शकते यात्रा या सुंदरमय जीवनाची।।१।।
तेजोमय प्रकाश ही विशेषता सुर्याची ,
सूर्याला हवी साथ ती प्रकाशाची…
सुगंधित दरवळ ही विशेषता फुलाची ,
फुलाला हवी साथ ती सुगंधाची …
त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ सुविचारांची…
नि हृदयाला हवी आहे साथ प्रेमाची…
सर्वोच्च विचार आणि प्रेमाच्या संगतीनेच ,
पूर्ण होऊ शकते यात्रा या रहस्यमय जीवनाची।।२।।
उत्कृष्ट कला ही विशेषता कलाकाराची ,
कलाकाराला हवी ती साथ कलेची …
शांत चित्त विशेषता आनंदी हृदयाची ,
हृदयाला हवी ती साथ शांत चित्ताची …
त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ कलेची …
नि हृदयाला हवी आहे साथ शांत मनाची …
स्मित हास्य आणि शांत मन यांच्या संगतीनेच ,
सुरु ठेवावी यात्रा या आनंदमय जीवनाची।।३।।
वेदांती
पुस्तकाला हवी साथ ती ज्ञानाची…
निर्मळ संस्कार ही विशेषता संतांची ,
संतांना हवी साथ ती संस्कारांची…
त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ सर्वोज्ञानाची …
नि हृदयाला हवी आहे साथ संस्कारांची …
सर्वज्ञान आणि सुसंस्कारांच्या संगतीनेच ,
पूर्ण होऊ शकते यात्रा या सुंदरमय जीवनाची।।१।।
तेजोमय प्रकाश ही विशेषता सुर्याची ,
सूर्याला हवी साथ ती प्रकाशाची…
सुगंधित दरवळ ही विशेषता फुलाची ,
फुलाला हवी साथ ती सुगंधाची …
त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ सुविचारांची…
नि हृदयाला हवी आहे साथ प्रेमाची…
सर्वोच्च विचार आणि प्रेमाच्या संगतीनेच ,
पूर्ण होऊ शकते यात्रा या रहस्यमय जीवनाची।।२।।
उत्कृष्ट कला ही विशेषता कलाकाराची ,
कलाकाराला हवी ती साथ कलेची …
शांत चित्त विशेषता आनंदी हृदयाची ,
हृदयाला हवी ती साथ शांत चित्ताची …
त्याप्रमाणेच
मनाला हवी आहे साथ कलेची …
नि हृदयाला हवी आहे साथ शांत मनाची …
सुरु ठेवावी यात्रा या आनंदमय जीवनाची।।३।।
वेदांती
संगतीचा परिणाम |