Friday, September 16, 2016

खुद की पहचान

रोकटोक हो या मनमानी,
कुछ पाने की हमने है ठानी।

उम्मिदों पे हैं दुनिया सारी,
पहुँचेंगे मंजिलो तक हमारी।

मिले सबको आज़ादी मनकी,
मुरादें सभी पूरी हो सबकी।

सामना करे मुश्किलो से डटकर,
कोशिशें है सबसे बढ़कर।

दुनिया से क्या जिना डरकर,
दिखाए हम भी ऊपर उठकर।

टिकीं रहे यहाँ सादगी,
सूकून से ज़ी सके जिंदगी।

आगेही बढते जाएंगे हम,
ना किसीसे भी है कम।

जरुरी है यहाँ खुद की पहचान,
मिले यहाँ सबको सम्मान।

-वेदांती 

खुद की पहचान
खुद की पहचान

Wednesday, August 31, 2016

तू हवीशी मला

सखे तू चांदणी,
तू हवीशी मला...
तुझ्यात गं राणी,
जीव हा गुंतला...

माझी तू संगिनी,
ओढ लावी मना...
तुझ्याच स्पर्शानी,
जीव हा रंगला...

माझी तू साजणी,
नाही कळलं तूला...
तुझ्याच वाणीनी,
जीव हा गुंगला...

सखे तू मोहिनी,
तू हवीशी मला...
तुझ्यात गं राणी,
जीव हा दंगला...

-वेदांती

तू हवीशी मला
तू हवीशी मला



Wednesday, July 20, 2016

भेट तुझी

साठवून डोळ्यात तुझीच आठवण,
तुझ्याच दिशेनं वाहतंय हे मन... 

                सहवासातले ते काही क्षण,
                वसले हृदयात दोहोंच्या पण ...

पुन्हा भेटण्याची ती ओढ नवी
आनंदाने एकमेकांस जी हसवी...

                नवी स्वप्नं नि नव्या आशा,
                उजळून येतील दाही दिशा...        

वेळोवेळी होई तुझाच भास,
वाटे लाभावा तुझाच सहवास...
             
               बघतेय प्रीतीत मी वाट तुझी,  
               वाटे क्षणांत व्हावी भेट तुझी... 
                          
-वेदांती
Bhet tujhi


Wednesday, July 13, 2016

College के दिन

COLLEGE में बढ़ती थी यारी,
बदलही जाती LIFE हमारी।
साथ रहते रहते दोस्तोके,
अलग ही चलती दुनिया सारी।

होती थी नई दोस्ती जहाँ,
और मिलते नए CRUSH
RECESS में ही तो हमारे,
बातों का होता RUSH

याद अभीभी आता है वो,
माँ का दिया हुआ TIFFIN
बात बातपर चिढ़ाना दोस्तो का,
और भूख लगने पर CANTEEN

खेलकुदमेही डूबें रहते,
मस्तीमें चलते हम।
संग दोस्तों के रहके,
भूल जाते बाकि सारे गम।

मिलकर सुलझाते कई उलझने ,
तब आई समझमे CARING
मिलकर करते शैतानीया भी ,
सिखी वहिसे SHARING

कही बातें होती प्यारभरी,
तो कही दुश्मनी जारी।
नहीं रही वो बातें अब तो,
ना ही रही वो यारी।

कुछ तो लगता है अधूरा,
अब तो यारो के बिन।
भूल ना पाएंगे दोस्तो, 
COLLEGE के वो सुहाने दिन।

-वेदांती

College के दिन
College के दिन

Friday, June 24, 2016

ओळख स्वतःची

सर्व गुणांनी संपन्न आपण,
अजाण त्या गुणांपासून...

अत्यंत किंमती प्रत्येक क्षण,
बस ताब्यात असावं लागतं हे मन...

आपल्याच हाती आयुष्य संपूर्ण,
म्हणून पाऊल उचलायचं तू जपून...

असावी फक्त अस्तित्वाची जाण,
आहोत आपणही कर्तृत्ववान...

पुरेसं नाही ते ठळक दिसणं,
पण अत्यावश्यक असतं ते 
स्वतःची ओळख असणं...
-वेदांती
olakh swatahchi

Wednesday, May 4, 2016

माँ तुमसा कोई नहीं

कोई नही माँ तुमसा कही,
जिंदगी मिली मुझे तुमसे तो ही।

तुझमे बसी है हर खुशी मेरी,
राहत मिले मुस्कान से तेरी।

देखके मिलता है दिलको सुकूँ,
आँचल में तेरे छिपकर रहूँ।

बात करके तुझसे, मुश्किले होती कम,
तेरी प्यारीसी फूंक से, दर्द सारे होतेेे नम।

तीरथ तो है तेरे चरणोंमें ही,
दुनिया ढूँढ रही है कही औरही।

तेरा तो बस यही है कहना,
प्यार ही प्यार बाँटते चलना।

माँ तू ही है सबसे बढ़कर,
राह दिखाएँ जो दिप बनकर।

चलती है दुनिया तुमसेही,
जगमगाओ माँ तुम ऐसीेही।
-वेदांती


कोई नही माँ तुमसा कही

Tuesday, April 5, 2016

सूर मनाचे

कधी उमगले, कधी विसरले,
मन हे मनाशीच गुंथले...

कधी रुसले, कधी बहरले,
मनाने मनालाच फुलवले...

झाले कधी अस्थिर, 
तर कधी स्थिरावले,
मनाने मनालाच सावरले...

झाले कधी अधीर,
तर कधी धिरावले,
मनाने मनालाच आवरले...

झाले कधी किमयेचा सागर,
तर कधी वाटले-
मनाने मनाचेच सूर अनुभवले...

-वेदांती
सूर मनाचे


Saturday, March 12, 2016

परकं धन

म्हणे ती आहे परकं धन,
मग सोडताना हात तिचे,
का दाटुनि जातं हे मन?

कठिण गं पोरी ही वाट,
पण येईल पुन्हा,
नवी पहाट...

आपुलकीने अपुल्या,
कर सर्वांचा तू सांभाळ…


संकटावर होऊनि खंबीर ,
सावर तू अपुला संसार,

सहवासाने तुझ्या गं पोरी, 
सदाच उजळू दे, ते घरदार …
-वेदांती 

Thursday, February 11, 2016

आहोत समर्थ आपण

गेलो हारविल्या आधी कधीतरी;
म्हणून
नेहमीसाठीच हरलेलो नाही आपण...

गेलो बनविल्या मूर्ख मध्यांतरी;
म्हणून
नेहमीसाठीच मूर्ख नाही आपण...


झालो निराश आधी केंव्हातरी;
म्हणून
नेहमीसाठीच निराश नाही आपण...

आली वादळे छोटी मोठी कितीही जरी,
तरी
रहायचं नसतं त्यांत अडकून आपण...

येतील काटे मार्गात कितीही जरी,
तरीसुद्धा
सतत पुढेच जात रहायचं असतं आपण...


मार्ग काढू कुठल्याही अडचणींतून,
कारण 
आहोत त्यासाठी समर्थ आपण… 
-वेदांती



Wednesday, January 27, 2016

तुझं तेच माझं

सुख दुःखाच्या क्षणांत
साथ मैत्रीला देत चला,
चिमुकल्या यशालाही
आनंदाने मिरवित चला....

आहे कुणी सोबत म्हणून
धीर जरासा मिळेल....
आत्मविश्वास वाढविणारा
आधार मैत्रीचा मिळेल....

तुझं माझं असं काही नाही
हाच मैत्रीचा नारा,
असावा मित्रपरिवार अपुला
सर्वांस समजून घेणारा....

टिकून राहो नेहमी
अशीच गोड ही मैत्री,
एकमेकांस सांभाळणारी
अशी ही खात्री.... 

-वेदांती

tuz tech maz

Thursday, January 14, 2016

DBM चं स्पंदन!!!!

Blind Risk असो वा Selfie Fever
Sack race असो वा FB Fever
DBM चा पगडा भारी
स्पंदन नी घेतली उंच भरारी

Angry Birds ने केली कमाल
Rodies नेही दाखवली धमाल

T-shirt Painting चा तर जवाब नाही
Poster Competition ची तर बातच सही

Lagan आमचा सर्वात भारी
Ranbhumichi होती गोष्टच न्यारी

असाच आनंद देत-घेत सर्वांसाठी
Spandan दरवर्षी येत राहील DBM साठी

-वेदांती
Dedicated to our Spandan Team DBM


DBM चं स्पंदन!!!!
DBM चं स्पंदन!!!!